🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड मधील टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण बऱ्याच ब्रँडचा चेहरा आहे. दीपिका पदुकोण मोठ्या मोठ्या ब्रॅण्डची ऍम्बेसेडर आहे आता दीपिकाच्या हाती अजून एक मोठा ब्रँड आहे. दीपिका पादुकोन आता Levi’s या ग्लोबल ब्रॅंडची ऍम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रॅंडच्या मते दीपिका ब्रॅंड ऍम्बेसेडर झाल्याने ते नवीन पिढीतील महिलांना त्यांच्या ब्रॅंडकडे आकर्षित करू शकतील. दीपिका ही भारतातील या ब्रॅंडचा चेहरा बनणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे.
दीपिका आता Levi’s या नवीन ब्रॅंडच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे. या ब्रॅंडमध्ये सामील झाल्यानंतर दीपिकाने तिचा फोटोही शेअर केला आहे. या व्यतिरिक्त दीपिकाला या ब्रॅंडशी जोडल्यानंतर Levi’s ने तिच्यासाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे
दीपिका पादुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना अभिनेत्री अखेर ‘छपक’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिका पादुकोणच्या अभिनयाची आणि तिच्या भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली होती. मालती अगरवालच्या भूमिकेतून दीपिकाने बरीच मने जिंकली. तथापि, ‘छपक’ चित्रपटामुळे पडद्यावर फारशी प्रगती होऊ शकली नाही. याशिवाय बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दीपिका पादुकोण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही.तसेच दीपिका ’83’ आणि ‘पठाण’ मध्ये दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये भारताने इंग्लंडला चारली धूळ !
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- मोठी बातमी : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीमुळे खळबळ
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
- ‘फक्त दोन दिवसातच मॅच संपली हे टेस्ट क्रिकेटच आहे का’? टीम इंडियाचा विजयावर युवराजची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
