Share

फुलंब्री-औरंगाबाद-सिल्लोड-खुलताबाद रोडवर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त 

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सध्या जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यात रस्ते, महामार्गाचे कामे सुरु आहे. औरंगाबाद-जळगाव, फुलंब्री खुलताबाद रोडवर सतत वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त दिसत आहे. औरंगाबाद ते जळगाव या महामार्गाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. याचा मनस्ताप सर्व सामान्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

शासनाच्यावतीने कोट्यावधी रुपये रस्त्याच्या कामासाठी खर्च करण्यात येत आहे.  परंतु याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने महामार्गाच्या कामात वेगवेगळा खोडा घालतल्या जात आहे. त्यामुळे कामे संथ गतीने होत असल्याचे  समाजिक कार्यकर्ते  सांगत आहे.

गेल्या आठवड्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने तालुक्यात दौरा केला होता. त्यावेळी फुलंब्री शहरातील खुलताबाद रोडवर वाहनांची एकच रांग लागल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यावर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असून देखील वाहनांची कोंडी झालेली बघायला मिळाली होती.

औरंगाबाद-जळगावचे महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु यात फुलंब्री टी पोइंटवर बसस्थानक परिसरात काळी – पिवळी अशी वाहने रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. या कोंडीकडे पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी वाहनधारक तसेच नागरिक करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!