🕒 1 min read
औरंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणाऱ्या चार जणांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या चारही घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिवाजी आसाराम कोथमिरे (वय 60, रा. सिंहगड कॉलनी प्रफुल हाउसिंग सोसायटी, सिडको, एन-6) यांनी गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एचएमटी कंपनी तुन सेवानिवृत्त झालेले शिवाजी कोथमिरे हे गेल्या काही वर्षापासून आजारी होते.
आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दुसऱ्या घटनेत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मोरे स्पोर्ट्स या बंद पडलेल्या कंपनीत भाऊसाहेब मतकर (वय 32 ,रा. नारेगाव परिसर) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
तिसऱ्या घटनेत मुकुंदवाडी परिसरातील स्वराज नगर येथे राहणाऱ्या पवन बाळू त्रिभुवन (वय 30) या युवकाने छताच्या पंख्याला दोरीच्या साह्याने बांधून गळफास घेतल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. चौथ्या घटनेत मयुरी मिसाळ (वय 20, रा. निसर्ग कॉलनी पेठे नगर) या तरुणीने बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वतःच्या पाइपला ओढणीने बांधून गळफास घेतला होता.
वरील चारही घटनांची नोंद अनुक्रमे सिडको, एमआयडीसी सिडको , मुकुंदवाडी आणि छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
