Share

एमआयएम खा.जलील यांच्या प्रकृतीसाठी विठ्ठलाचा जप

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादचे एमआयएम खासदार सय्यद इम्तियाज जलील यांना कोरोना झाला आहे. सध्या ते शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी आणि ते कोरोनातून लवकर बरे व्हावे एका हितचितंकाने प्रार्थना केली आहे. गंगापूर तालुक्यातील आगरवाडगाव येथील विठ्ठल -रुख्मिनी मंदिर ट्रस्टच्या वतीने जलील यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ भोजने यांनी खा. जलील यांच्या तब्येतीसाठी अकरा हजार एकशे अकरा नामजप केला.

दरम्यान, जलील यांची प्रकृती उत्तम राहावी आणि ते कोरोनातून लवकर मुक्त व्हावे याकरिता यवतमाळच्या पुसद येथे एमआयएम पदाधिकाऱ्याने हवन पूजा केली. कृष्णा जाधव असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते एमआयएमचे युवक मराठवाड़ा उपाध्यक्ष आहेत. खा.इम्तियाज यांच्यासाठी कृष्णा यांनी पूसद ते निंबी हे साधारण पाच किलोमीटरचे अंतर पायी चालले. निंबी येथील भवानी टेकडीवर त्यांनी हवन पूजाही केली. जलील यांची तब्येत ठीक राहावी म्हणून त्यांनी देवीला साकडे घातले.

गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतःला आयसोलेट केले होते. सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित रहा’.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!