🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्रासह गोवा ते गुजरातमध्ये भाजप- काँग्रेस सारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांना सक्षम पर्याय म्हणून आप उद्यास येत आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांपासून भारतभर आपचा विस्तार होत आहे. गुजरातच्या नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने लक्षवेधी प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी या विजयाबद्दल जल्लोष साजरा केला. तसेच येत्या औरंगाबाद मनपा निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरुन जिंकण्याचा संकल्प केला आहे.
अनेक राज्यातील नागरिक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विकासावर आधारित राजकीय मॉडेल सक्षम पर्याय म्हणून स्वीकारत आहेत. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असूनही आप ने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली. आणि ही बाब आमचाही आत्मविश्वास वाढवणारी आहे, असे आप महाराष्ट्राचे संयोजक रंगा राचुरे यांनी म्हटले आहे. गुजरातमधील सुरत महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचे २७ नगरसेवक निवडून आले आहे. तर भाजपाचे ९३ नगरसेवक निवडून आले आहेत. आप दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणून उदयास आला आहे.
औरंगाबाद संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी या विजयाबद्दल जल्लोष साजरा केला. व येत्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आप दमदार कामगिरी करेल असा विश्वास यावेळी आपचे मराठवाडा अध्यक्ष डॉ.सुभाष माने, मराडवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे, शहर कार्याध्यक्ष इसाक आंडेवाला यांनी व्यक्त केला.
यावेळी आप नेते सतिश संचेती, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्त्तु पवार, शहर उपाध्यक्ष वैजनाथ राठोड, मिडीया अध्यक्ष गौरव भर्गव, शहर सचिव अशीर जयहिंद, शहर संघटनमंत्री मंगेश गायकवाड, प्रकाश जाधव, अंकुश आगे, आप महिला अध्यक्षा रुपाली धनेधर यांसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- एमआयएम खा.जलील यांच्या प्रकृतीसाठी विठ्ठलाचा जप
- पिंक बॉल टेस्टमध्ये रो’हिट’चा विक्रम!
- अल्पवयीन चालकाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू,तर अल्पवयीन जखमी
- बीड बायपास रोडवर विविध अपघातात दोघांचा मृत्यू
- सोप्या शब्दात जाणून घ्या सोशल मिडिया बाबत काय आहेत नव्या गाईडलाईन्स ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
