🕒 1 min read
अहमदाबाद : भारत आणि इंग्लड यांच्यात सुरु असलेल्या दिवस-रात्र कसोटीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने सामन्यात दोन विक्रमांना गवसणी घातली आहे. कसोटी सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक झळकावताच रोहितने मायदेशात ६००० अतंरराष्ट्रीय धावा पुर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो केवळ ९ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताचे ९ गडी गमावून १४५ धावा केल्या होत्या
याआधी सचिन तेंडुलकर (१४१९२ धावा), विराट कोहली (९६८८ धावा), राहुल द्रविड़ (९००४ धावा), विरेंद्र सेहवाग (७७९६ धावा), महेंद्र सिंग धोनी (७५७५ धावा), मोहम्मद अजहरुद्दीन (६५७५ धावा), सौरव गांगुली (६४१० धावा), सुनील गावसकर (६२५९ धावा) यांनी ही कामगिरी केली आहे. या विक्रमासोबतच रोहितने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात २५०० पेक्षा जास्त धावा करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी विराट कोहली आणि मार्टिन गुप्टिल यांनी केली आहे.
कसोटीचा पहिला दिवस हा पूर्णपणे भारतीय गोलंदाजानी गाजवला. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फिरकीपटू अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या जोडीने चुकीचा ठरवत अवघ्या ११२ धावांवर इंग्लड संघाला तंबुत धाडले. तसेच सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माला १००० धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या १०० धावांची गरज आहे. त्याच्या नावे १० डावात ९०० पेक्षा अधिक धावा आहेत. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सोप्या शब्दात जाणून घ्या सोशल मिडिया बाबत काय आहेत नव्या गाईडलाईन्स ?
- शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांनी सर्व नियम तोडून कुटुंबासह घेतली कोरोनाची लस
- दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव गडगडला; रहाणे, शर्मासह एका मागे एक फलंदाज परतले
- आगामी मर्सिडीज-बेंझ ची कार असेल मेड इन इंडिया; 4 सेकंदात 100 किमी वेग पकडणार
- गॅस, रेशनचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
