Share

लाॅकडाऊनची सर्वसामान्यांनी घेतली धास्ती, जीवनावश्यक वस्तूंची होतेय चढ्या दराने विक्री

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. या काळात अनेक व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू ज्यादा दराने विक्री करून सर्वसामान्यांची लूट केली होती. तशी स्थिती आता निर्माण झाली आहे. लॉकडाउन कधीही लागू शकते अशी चर्चा सुरू झाली. याचा फायदा घेत काही छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गतवर्षी कोरोना चा वाढता संसर्गामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊन मधून औषधी दुकाने व किराणामाल दुकाने बंद ठेवली होती. जिल्हा बंदी लागू असल्याने अन्य जिल्ह्यातून अन्नधान्य पुरेशा प्रमाणात येत नव्हते. वस्तूंचा तुटवडा याची संधी साधत व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू धान्य, तेल, डाळी, साखर, चहापत्ती, भाजीपाला, फळे यांच्या किंमती वाढविल्या होत्या सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.

वाढती संख्या लक्षात घेऊन मार्च महिन्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊन लागल्यास गरीब मजूर, कामगार, मध्यमवर्गीय कुटुंब यांची अडचण वाढणार आहे. लोकांनी आत्तापासून जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. छोटे छोटे किराणा व्यापारी मात्र चढ्या दराने वस्तूची विक्री करून लूट करत आहेत. लॉकडाऊन लागल्यास अनेकांवर बेरोजगारी येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाईची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!