🕒 1 min read
वैजापुर: वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे बुधवारी (दि. २४) दुपारी हाॅटेल बाबा शेजारी वैजापुर-श्रीरामपुर रस्त्यावर मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन एक ठार तर २ शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यात नारायण रामभाऊ कुरकुटे (वय ४५) राहणार नागमठान ता.वैजापुर अपघातात ठार झाले आहेत. अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देण्याच्या चूकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागली.
बुधवारी दुपारच्या वेळेस एम.एच.२० इ.आर ०८४८ बजाज पल्सर आणि विना नंबरची होंडा कंपनीची शाईन गाडी या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यावेळी यात पल्सर गाडीवर असलेला कुणाल विजय त्रिभुवन रा.खंबाळा (वय १५) आणि इतर १ विद्यार्थी तसेच होंडा शाईन वरील नारायन रामभाऊ कुरकुटे वय ( ४५ ) रा. नागमठान असे तिघेजन गंभीर जखमी झाले होते.
हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरील बाजुचा अक्षरशः चुराडा झालेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाडगाव येथील प्रमोद सोमवंशी ,राजू जाधव, विकास सोमवंशी , नितिन निंबाळकर, किरण जगताप यांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेत सरला बेटाच्या रूग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नारायण कुरकुटे यास तपासुन मृत घोषित केले. तर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघातातील दोन्ही अल्पवयीन मुले हि न्यू हायस्कूल लाडगाव येथे ८ वी च्या वर्गात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. तर मयत नारायण कुरकुटे नागमठाण येथील रहिवासी होते परंतु ते सराला बेटावर जास्तवेळ असत. सरला बेटाचे ते निस्सीम भक्त व सरला बेट ते पंढरपूर जाणाऱ्या गंगागिरी महाराज दिंडीचे ते वाहन चालक होते.
अपघात झाला त्यावेळी ते सराला बेट येथील भक्तांसमवेत वैजापुर येथे गेले होते. येतांना शालेय विद्यार्थी यांच्या गाडीची समोरासमोर धडक बसुन यात त्यांचा मृत्यू झाला. या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करून या शाळेवर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक अथवा पोलिस कर्मचारी नेमण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी अपघाताची माहिती पोलिस पाटील वाढेकर व ग्रामस्थांनी विरगाव पोलीसांना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गॅस, रेशनचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड
- मराठा समाजाचा आक्रोश मेळावा, ‘माझे आरक्षण, माझी जबाबदारी’
- अवघ्या २७ धावा फटकावून विराट ठरला ‘या’ विक्रमाचा मानकरी
- भारतात देखील डिजिटल करन्सीचे रिझर्व्ह बँकेचे संकेत
- राठोडांसोबतच्या महंतांना झाली कोरोनाची लागण; मुख्यमंत्र्यांनी गमावला सर्वसामान्यांचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
