औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगावात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ मार्च रोजी आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ‘माझे आरक्षण, माझी जबाबदारी’ ही टॅग लाईन करण्यात आली आहे.
साष्टपिंपळगाव इथल्या या आक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने सकल मराठा समाज एकत्र येत आहे. मराठा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या साष्टपिंपळगाव इथे सुरू आहे. परिसरातील अनेक गावातील लोकही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. सरकारला जागे करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे, याची जाणीव सरकारला करून देण्यासाठी हा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्या संदर्भात विविध जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी साष्टपिंपळगावमध्ये दाखल होणार आहे. या मेळाव्यात सकल मराठा समाजातील बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्यस्तरीय ठिय्या आंदोलनाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वडिलांच्या आठवणीत गोपीनाथ गडावर प्रितम मुंडेंकडून फुलांची आरास
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
