🕒 1 min read
अहमदाबाद : गुजरात येथील भारत आणि इंग्लड संघादरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अवघ्या २७ धावा करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. केवळ २७ धावांच्या छोट्या खेळीसह विराट कोहलीने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध आपल्या २००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह विराट कोहली हा इंग्लंडविरुद्ध २००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय ठरला आहे आणि जागतिक क्रिकेटमधील पाचवा कर्णधार बनला आहे.
ही कामगिरी याआधी ऑस्ट्रेलियाचा अॅलन बॉर्डर (३१९१), दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२९७८), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२७२६) आणि ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन (२४३२) यांनी केली होती. आहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी जोरदार कामगिरी करत इंग्लड संघाचा डाव अवघ्या ११२ धावावंर आटोपला. भारताकडून अक्षर पटेलने ६ विकेट्स घेतल्या
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ६ गडी गमावत ११७ धावा करत ५ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावत ६६ धावा केल्या आहेत. तर इंग्लड संघाकडून जॅक रिचने सर्वाधीक ४ विकेट्स घेतल्या आहेत. आर आश्विन हा २ धावावर खेळत होता.
महत्वाच्या बातम्या
- भारतात देखील डिजिटल करन्सीचे रिझर्व्ह बँकेचे संकेत
- राठोडांसोबतच्या महंतांना झाली कोरोनाची लागण; मुख्यमंत्र्यांनी गमावला सर्वसामान्यांचा विश्वास
- वडिलांच्या आठवणीत गोपीनाथ गडावर प्रितम मुंडेंकडून फुलांची आरास
- …परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’ – निलेश राणे
- शर्मा-रहाणेच्या जोडी कडून भारतीय संघाच्या अपेक्षा भंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
