Share

भारतात देखील डिजिटल करन्सीचे रिझर्व्ह बँकेचे संकेत

Published On: 

मुंबई: ८ नोव्हेंबर २०१६ साली अचानक नोट बंदीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याचे अनेक फायदे आणि तोडे असे वेगवेगळे परिणाम दिसून आले. तर नुकतच आता आणखी काही चलनी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिसर्व्ह बँकेने घेतला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. रिसर्व्ह बँकेने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘सध्या चलनात असलेल्या १००, १०, आणि ५ रुपयांच्या सर्व नोटा बंद होणार असल्याच वृत्त आले होत मात्र हे वृत्त चुकीच आहे. रिसर्व्ह बँकेने २०१८ मध्येच १०० रुपयांची नवी नोट जारी करतानाच जुन्या नोटा बंद होणार नसल्याच सांगितलं होत.’ त्यामुळे हे चुकीचे वृत्त सोमवारी आरबीआयने फेटाळून लावले आहे.

नोटबंदीच्या काळात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आणि आता कोरोना काळात हे व्यवहार आणखी मोठ्या प्रमाणात डिजिटल होत असून नागरिक सर्रास ऑनलाईन पेमेंट करत आहेत. तर आता ऑनलाईन पेमेंट वरून जगामध्ये क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना वाढीस लागत आहे. यामध्ये चलन डिजिटल असते मात्र याबाबत चिंता देखील व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मत व्यक्त केल आहे.

‘रिझर्व्ह बँक सध्या एका डिजिटल करन्सीवर काम करत आहे. ही करन्सी क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगळी असेल. तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही मागे राहू इच्छित नाही. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या फायद्यांचा वापर केला पाहिजे,’ असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. बॉम्बे चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या १८५ व्या फाऊंडेशन दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

भारत यशस्वीते मार्गावर पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचंही दास म्हणाले. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरही भाष्य केलं. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी आपले कर कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी मिळून योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे, असंही दास यांनी नमूद केलं.

‘उत्पादन क्षेत्राला आवश्यक असलेल्या वृद्धीला गती देण्यासाठी काम सुरू आहे. देशात एमएसएमई क्षेत्रा अर्थव्यवस्थेचं इंजिन बनून पुढे आलं आहे. कंपन्यांना आता आरोग्य सेवांच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. क्रिप्टोकरन्सी बाबत आमच्या काही चिंता आहेत. तसंच आम्ही एमएफआय क्षेत्रासाठीही नियमांमध्ये सुधारणा करण्यावरही काम करत आहोत,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!