मुंबई : संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले.यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.
अनेक माध्यमांनी त्यावेळी कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली होती आज ती भीती खरी ठरली असल्याचे समोर आले आहे. कारण पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे.
फक्त कबिरदास महाराजच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील आणखी तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.विशेष म्हणजे कबिरदास महाराज संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. संजय राठोड त्याठिकाणी आले तेव्हा विविध ठिकाणहून हजारो जण पोहरादेवीत उपस्थित होते.
दरम्यान,आता या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमण केल्याची जबाबदारी राठोड आणि कबीरदास महाराज घेणार का असा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन मंत्रीच करणार नसतील तर सर्वसामन्यांना या नियमांचे पालन करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरणे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न अनुत्तरीत आहे. एवढी गर्दी जमवून देखील राठोड यांच्यावर या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वसामन्यांचा विश्वास गमावला गमावला असल्याचे दिसून येत आहे.दुसऱ्या बाजूला ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, एवढे महाभारत घडत असताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई माध्यमांशी बोलताना एक अजब दावा केला आहे.ते म्हणाले, ‘संजय राठोड यांनी गर्दी जमवली असे नाही. ते देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे तेथे गर्दी झाली. चौकशी केल्यावर कोरोनाचे उल्लंघन झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाला आदेश दिले होते. त्याप्रमाणे तेथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणामुळे कोणीही नाराज नाही.”असे म्हणत राठोड यांची बाजू देसाई यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वडिलांच्या आठवणीत गोपीनाथ गडावर प्रितम मुंडेंकडून फुलांची आरास
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
