Share

मोदींना दिंडाची साथ ! माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाचा भाजपामध्ये प्रवेश

Published On: 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये साधारण एप्रिलदरम्यान विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता  आहे. या निवडणुकीच्या तारख्या येत्या काही दिवसात जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापू लागले असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक दिग्गज नेते वैतागून तृणमूल कॉंग्रेसची साथ सोडत असताना आता माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणि संध्याकाळपर्यंत माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने आपण भाजपमध्ये सामील होत असल्याचे नक्की केले.

यासह या दोन क्रिकेटपटूंची राजकीय खेळी सुरू झाली आहे. मैदानात आपल्या वेगवान चेंडूंनी अनेक फलंदाजांना पाणी पाजणाऱ्या दिंडाने पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होऊ शकते. दरम्यान, बंगालमध्ये नवीन चेहरे आणि जनमत असलेल्या नेत्यांचा आपापल्या पक्षामध्ये समावेश करण्याची स्पर्धा चांगलीच रंगली आहे. एकीकडे, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे अनेक भलेमोठे चेहरे भाजपमध्ये सामील झाले आहेत, तर दुसरीकडे बरेच नवीन चेहरेही राजकारणात आपले नशिब आजमावण्यासाठी पुढे येत आहेत.

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला होता. कीर्ती आजाद, चेतन चौहान, मोहम्मद अजहरुद्दिन, मोहम्मद कैफ, गौतम गंभीर यांनीदेखील विविध पक्षांकडून निवडणुकांची रणधुमाळी अनुभवली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!