🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आज (दि. २४ फेब्रुवारी) आहे. या कसोटीचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. हा डे-नाईट कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खलवण्यात येईल. दुसरं म्हणजे सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये हा पहिलाच सामना खेळवला जात आहे. तत्पुर्वी चेन्नईत झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळपट्टीमुळे बराच विवाद निर्माण झाला होता. परंतु अहमदाबाद स्टेडियमची खेळपट्टी चांगली असल्याचा दावा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने केला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे सचिनने यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘अहमदाबाद स्टेडियम साबरमती नदीच्या जवळ आहे. त्यामुळे या स्टेडियमच्या खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. परिणामत: पूर्ण ५ दिवसही खेळपट्टीचा रंग बदलणार नाही. यामुळे तुम्ही चकित होऊ नका,’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.
साधारणपणे कसोटी सामन्यात विशेष करुन भारतात प्रत्येक दिवशी खेळपट्टी रंग बदलते. खेळपट्टीत भेगा पडतात. मात्र सचिनच्या म्हणण्यानुसार अहमदाबाद स्टेडियम साबरमती नदीच्या नजीक असल्याने खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. त्यामुळेच सामन्याचे पाचही दिवस खेळपट्टीचा रंग एकच असेल. या खेळपट्टीतील ओलाव्यामुळे संध्याकाळी वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
