🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आज (दि. २४ फेब्रुवारी) आहे. या कसोटीचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. हा डे-नाईट कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खलवण्यात येईल. दुसरं म्हणजे सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये हा पहिलाच सामना खेळवला जात आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याचा हा १०० वा कसोटी सामना आहे. या खास सामन्याची सुरुवात इशांतने धडाकेबाज रित्या केली आहे. इशांतने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर डॉमनिक सिबलेला शून्यावर आऊट केलं. रोहित शर्माने सिबलेने मारलेला चेंडू अचूक झेलत इशांतला हे यश मिळवून दिले आहे. दरम्यान, इशांत शर्मा टीम इंडियाकडून 100 सामने खेळणारा एकूण 11 वा तर कपिल देव यांच्यानंतर दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे.
What a way to start your 1⃣0⃣0⃣th Test! ????????@ImIshant strikes early for #TeamIndia as England lose Dominic Sibley. ????????
A sharp catch from @ImRo45! ????????@Paytm #INDvENG #PinkBallTest
Follow the match ???? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/XiG0cjQBOC
— BCCI (@BCCI) February 24, 2021
इंग्लंडची ‘धक्का’दायक सुरुवात
इशांत शर्माने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर डॉमनिक सिबलेला शून्यावर आऊट केलं. यानंतर, जॉनी बेयरस्टो याला अक्सर पटेलने पायचीत (LBW) करत माघारी धाडलं. यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला असताना दुसऱ्याबाजूला सलामीवीर झॅक क्रॉलीने संयमी खेळी केली.
क्रॉलीने शानदार अर्धशतक लगावलं आहे. मात्र, इंग्लंडच्या अडचणीत वाढ कायम असून कप्तान जो रूट याला आर. अश्विन याने पायचीत केले. यानंतर लगेचच, झॅक क्रॉली याला अक्सर पटेलने पायचीत करून परत पाठवलं आहे. यामुळे इंग्लंडचा पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
- भोंगळ कारभार : कोकणातल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याच सेंटर, तर मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना…
- नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ‘दंगेबाज’ आहेत : ममता दीदी
- अमित देशमुखांचे ‘गुजरात’ प्रेम ; विलास सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात केला उल्लेख
- ‘हे’ मंत्री मराठा समाजाचे वैरी आहेत ; विनायक मेटेंचा घणाघाती आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
