कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गेल्या १० वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या सत्तेला भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे. परवा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभा घेवून पश्चिम बंगालमध्ये भ्जाप्च सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले.
पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आज ममता बॅनर्जी यांनी रॅली केली. यावेळी त्यांनी भाजपला ‘दंगाबाज’ आणि ‘धंदाबाज’, असे नाव दिले. एवढेच नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मी गोल किपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजप नेहमीच म्हणते, की तृणमूल काँग्रेस ‘टोलाबाज’ आहे. मात्र, मी म्हणते, की भाजप ‘दंगाबाज आणि धंदाबाज’ आहे. नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ‘दंगेबाज’ आहेत. ‘विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही.’ हल्लोबोल करत ममता म्हणाल्या ‘बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.’ असा घणाघाती आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजप वर केलेला आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ममतांनी मोदींची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली. ममता म्हणाल्या, ‘अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही खराब नशीब पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे.’ बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूर्ववैमनस्यातून युवकावर अॅसीड हल्ला, उजवा डोळा झाला निकामी
- भोंगळ कारभार : कोकणातल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याच सेंटर, तर मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना…
- आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात बच्चु कडूंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र
- भोसरी जमीन प्रकरण : एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा कायम !
- ‘हे’ मंत्री मराठा समाजाचे वैरी आहेत ; विनायक मेटेंचा घणाघाती आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
