Share

अमित देशमुखांचे ‘गुजरात’ प्रेम ; विलास सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात केला उल्लेख

Published On: 

लातूर : काँग्रेसचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्याना ‘गुजरात पॅटर्न’चा आभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पालकमंत्र्यानी हे उद्गार काढले. यावेळी बोलताना ते म्हणाले की साखर कारखान्यानी ‘गुजरात पॅटर्न’चा आभ्यास करुन शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने एफआरपी पेक्षा जास्तीचा उस मोबदला देणे शक्य आहे का? याचा अभ्यास करण्याचा सल्ला यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी दिला.

सोमवारी विलास सहकारी कारखान्याच्या १८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. साखर कारखान्यानी आता फक्त साखर उत्पादनाच्या मर्यादेत न राहता मूल्यवर्धन करणाऱ्या इथेनॉल, वीज, सीएनजी, कॉम्प्रेस बायोगॅस तसेच इतर केमीकल, वैद्यकीय औषधे व उपकरणे निर्मीतीकडे लक्ष द्यावे असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सुचवले. शेतकरी व इतर घटकांना अधिकचे आर्थिक लाभ देऊन विकास प्रक्रिया गतीमान करावी असे पालकमंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले.

आताचा शेतकरी हा काटकसरीने व सुक्ष्म सिंचनाचा वापर करुन एकरी अधिकचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उस हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे ते घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. पण यासाठी पाण्याचे नियोजन अवश्यक आहे असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष वैशाली देशमुख, आमदार वैजनाथ शिंदे, अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची उपस्थिती होती

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!