मुंबई : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी ८ हजार ५०० पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागील महिन्यात दिली होती.
काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. २८ फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात ५० टक्के जाभा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती.
दरम्यान, परीक्षेला अवघे चार दिवस शिल्लक असताना मंत्री बच्चू कडू यांनी महाआयटी या खाजगी कंपनीच्या कामात अनियमितता असल्याची तक्रार केली आहे. आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात बच्चु कडू यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहित ऑनलाईन परीक्षेचा आढावा घेऊन, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र पुर्ववत करून देण्याची केली मागणी केली आहे.
‘विदर्भात लॉकडाऊनची स्थिती असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नूकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी तीन परीक्षेचा अर्ज भरूनही एकाच परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तीनही परीक्षांची संधी देण्यात यावी’, असंही पत्रात नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… पवार साहेब फक्त नाराज होणार पण कारवाई नाही होऊ देणार’
- प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही; मीम्स पाहून व्हाल वेडे !
- ‘पवार फक्त नाराज होणार पण राठोडांवर कारवाई नाही होऊ देणार’
- ठाकरे सरकारच्या प्रतिमेची शरद पवारांना वाटत असेलेली काळजी हा फक्त दिखावा ?
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
