Share

भोंगळ कारभार : कोकणातल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याच सेंटर, तर मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना…

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : राज्यासह देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थांमधील कमतरता, अद्ययावत उपकरणांची गरज, मनुष्यबळ या गोष्टी प्रकर्षाने समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागांमधील रिक्त जागांची त्वरित भरती करण्याची गरज उद्भवली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती जाहीर केली आहे. त्यासाठी 28 फेब्रुवारीला परीक्षा होणार.

28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जाभा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा राजेश टोपे यांनी सोमवारी औरंगाबादेत केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जागा भरल्या जाणार आहे. तर साडे आठ हजारांपैकी सुरुवातीला 5 हजार जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आता या भरती प्रक्रियेच्या परीक्षा नियोजनाबाबत प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. राज्यात कोरोनाची वाढती स्थिती घेऊन प्रवासातील धोका टाळण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या जवळचे परीक्षा केंद्र देणे गरजेचे होते. मात्र, कोकणातील विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना कोकणातील परीक्षा केंद्र दिले गेल्याचे समोर आले आहे.

याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिलं जावं अशी मागणी केली आहे. ‘येत्या २८ तारखेला शासनाने आरोग्य सेवक पदाच्या परिक्षा ठेवल्या असुन मराठावाडयातील विद्यार्थ्यांना कोकणात सेंटर दिले असून कोकणातील विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील सेंटर दिलेत. एवढा लांब प्रवास करणे खर्चीक व कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच परिक्षा सेंटर दिले पाहिजे.’ अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!