Share

आता सरकारी कार्यालयात प्रवेशासाठी कोरोना टेस्ट अनिवार्य

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विशेषतः शहरात नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक गतीने वाढते आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक गतीने पसरत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेने आता कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून (दि.२४) टाऊनहॉल परिसरातील महापालिका मुख्यालयात बाहेरुन येणाऱ्यांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी देखील मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे.

आज (दि.२४) सकाळपासून २१ जणांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आलेले नाहीत. मनपा आयुक्त तथा प्रशासकीय आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची आरोग्य विभागाची टिम याठिकाणी कार्यरत आहेत. या टेस्टनंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी याठिकाणी एक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विशेषतः शहरात नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक गतीने वाढते आहे. या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!