Share

‘दहा हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका ‘गबरु’वर कारवाई नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

त्यामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचं पालन केलं जाईल’, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. ‘कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई नाही? एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा. मुख्यमंत्री बोलणार नाहीत? महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे…तो मी नव्हेच‼️’, अशा आशयाचे ट्वीट करत शेलारांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!