Share

‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’

Published On: 

मुंबई : संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

यावरच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, नियम तोडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील सोडत नाही, संजय राऊतांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीबाबत भाष्य केलं.

पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचं पालन केलं जाईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. ‘पालघर साधू हत्याकांडापासून दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत, मेहबूब शेख, धनंजय मुंडे, पूजा चव्हाण प्रकरणातली कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे…’, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!