Share

नांदेड मनपा कर्मचाऱ्यासाठी खुशखबर! सातवा वेतन आयोग होणार लागू

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : शहरातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मंजुरी दिली आहे. मगंळवारी २३ फेब्रुवारी रोजी आयुक्तांनी यांसबधित आदेश काढले आहेत. या आदेशाचा लाभ नांदेड मनपातील १ हजार ५६१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे मनपा कार्यालयात आंनदाचे वातावरण आहे.

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोबर २०२० रोजी आयुक्त डॉ. लहाने यांची भेट घेऊन सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दाखवत, कर्मचाऱ्यांचा तो हक्क असल्याचे सांगत याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करुन तो मंजूरही करुन घेतला. राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत ऑगस्ट २०१९ मध्ये निर्णय घेतला होता. या निर्णयाप्रमाणे याबाबतचे प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नांदेड मनपाने सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला होता.

या ठरावानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत मान्यता दिली होती. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने १५ नोव्हेंबर २०१९ रोजी शासनाकडे सादर केला. त्यानुसार नांदेड-वाघाळा महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास अन् प्रत्यक्ष वेतन १ डिसेंबरपासून देण्यास मान्यता मिळाली आहे. मनपा आयुक्तांच्या या आदेशानंतर मनपा कर्मचाऱ्यांची जवळपास दीड वर्षापासूनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता. परंतु मनपाच्या प्रस्तावातील त्रुटीमुळे दोन वेळा शासनाने हा प्रस्ताव मनपाकडे परत पाठविला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!