🕒 1 min read
पालमपूर : २०१४ पासून केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप ने त्या नंतर अनेक राज्यांमध्ये सत्ता समीकरणे बदलत सत्ता काबीज केली. यामध्ये भाजप ने आपले ओपरेशन लोटस अधिक सक्रीय करत विरोधकांना मात दिली आहे. मात्र यामध्ये आपल्या सिद्धांताशी कधीही तडजोड करता कामा नये असा सल्ला खुद्द भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने दिला आहे.
भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य तसेच वरिष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी पक्षाच्या आताच्या धोरणांवर टीका करत सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतेय, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच भारतीय जनता पक्ष राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे. ही केवळ सुरुवात आहे. राजकीय प्रदुषणाचा माझ्यासारख्या काही जणांना अतिशय त्रास होतोय. आम्ही काम केलेला आणि वाढवलेला हाच भाजप आहे का, असे अनेकदा मनात येते, अशा शब्दांत पक्षाच्या आताच्या धोरणांवर शांता कुमार यांनी हल्लाबोल केला. शांता कुमार यांचे आत्मकथन असलेल्या ‘निज पथ का अविचल पंथी’ या पुस्तकारचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शांता कुमार यांनी भाजप ची विचारधारा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून निर्माण झालेली आहे. मात्र आता भारतातील संपूर्ण राजकारण भरकटून दिशाहीन झाले आहे. एक काळ होता, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख नेते भाजपची धोरणे आणि सिद्धांत यावर लक्ष ठेवून असायचे. भाजपने सिद्धांताशी तडजोड करू नये, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. मात्र, हळूहळू संघाचे मार्गदर्शन कमी होऊ लागले आहे. एकूण परिस्थिती पाहता अतिशय चिंता वाटते, असे शांता कुमार यांनी सांगितले.
२०१४ मध्ये भाजपने प्रथमच ऐतिहासिक विजय प्राप्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला कुशल नेतृत्व लाभले. देशाने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुसद्देगिरीचे शांता कुमार यांनी कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- पुणे : तडीपार असतानाही सराईत गुंड हातात कोयता घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
- आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक
- पंतच्या मस्तीने विराटही घाबरला, पहा व्हिडीओ
- मोबाईलवरुन झालेल्या वाादात चाकू भोसकल्याने तरुणाचा मृत्यू
- उत्पादन शुल्क निरीक्षकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
