🕒 1 min read
औरंगाबाद : यापूर्वी कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनला परवानगी दिली होती. यामध्ये कोरोना रुग्णास घरात राहून उपचार घेता येत होते. त्याकरिता डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतले जात होते. मात्र आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावेच लागेल. घरी राहून उपचार घेता येणार नाही, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शनिवारी सांगितले.
वातावरणातील बदल, तसेच लग्न समारंभास गर्दी, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणे, शहरात फिरणे, मास्कचा वापर टाळणे हे प्रकार आता नागरिकांनी थांबवावेत, असे आवाहनही पाडळकर यांनी केले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात होम आयसोलेशनला परवानगी होती. त्यावेळी अनेकांनी होम आयसोलेशनला पसंती दिली होती.
मात्र आता होम आयसोलेशनला परवानगी नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी अथवा मनपाच्या कोवीड सेंटरवर उपचार घ्यावे लागतील.
कडक उपाययोजना, कोविड सेंटर सुरू
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने शहरात कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच रूग्णांच्या उपचारासाठी शनिवार दि.20 पासून किलेअर्क व एमजीएम स्पोर्टस् येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू केले आहे. नियम न पाळणार्या लग्न कार्यालये, कोचिंग क्लासेसवर पालिकेच्या नागरी मित्र पथकांकडून कारवाई केली जात आहे. सोबतच ज्या घरांत दोन ते तीन रूग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. शहरात प्रवेश करणार्या मार्गावर चौकशीसाठी पथके, विमानतळ, रेल्वेस्टेशन व मध्यवर्ती बसस्थानकावर येणार्या प्रवाशांची नियमित कोरोना चाचणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर मरतील : यशोमती ठाकूर
- ८ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी कडक निर्बंध लावणार – छगन भुजबळ
- चिंताजनक! लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना
- परभणीत पेट्रोल शंभरीला केवळ ९० पैशांनी दूर! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
- मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी : भाजप नेते गणेश नाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
