Share

चिंताजनक! लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना

Published On: 

उस्मानाबाद : उस्मानाबादमधून एक चिंता निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी कोरोनाची लस घेतली होती. मात्त्यांर, आता त्यांच्यासोबत पत्नी प्रियांका बोकील यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढत आहे, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून त्यात अधिक वाढ झाली आहे. अगोदर साधारण सहा ते दहा असणाऱ्या रुग्णांची संख्या थेट वीस ते २५ च्या घरात जाऊ लागली आहे. त्यातही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना याची लागण झाल्याने ही बाब ठळकपणे समोर आली आहे. त्यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी दिवेगावकर हे देखील आहेत. अनेक राजकीय पुढाऱ्यांनाही त्याची लागण झाली असून मधल्या काळात नियमाबाबत दक्षता न घेतल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसतेय.

जिल्ह्यात अनेक सामाजिक त्यातही गर्दीचे कार्यक्रम दरम्यानच्या काळात झालेले आहेत. काही होणार होते, त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण जिथे कार्यक्रम झाले आहेत, तिथे मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही दिवसात त्याचे अधिक व्यापक स्वरुप समोर येण्याची भिती व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार घेतले. सध्या ते त्यांच्या घरामध्येच विलगीकरणात आहेत. तेथूनच ते काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी पुढील काळात संसर्गाचे व्यापक स्वरुप पाहुन कोविड सेंटर चालु करण्याबाबतचे नियोजन देखील केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!