Share

परभणीत पेट्रोल शंभरीला केवळ ९० पैशांनी दूर! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढच होत आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९८ रुपये १४ पैशांपर्यंत पोहोचला आहे. तर, डिझेलच्या दराने ८९ रुपयांचा टप्पा पार केला आहे. परभणीत साध्या पेट्रोलची किंमत ही ९९ रुपये १० पैसे इतकी आहे. परभणीत पेट्रोल शंभरीला केवळ ९० पैशांनी दूर असल्याचे दिसत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींतील वाढ अजूनही कायम आहे. आधीच राज्यातील अनेक शहरात स्पीड व अन्य पेट्रोलचे दर हे १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. साध्या पेट्रोलचे दर अजूनही १०० रुपयांच्या आत आहेत. मात्र, ही दरवाढ कायम राहिल्यास साध्या पेट्रोलचेही दर हे १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरात साध्या पेट्रोलचे दर हे ९८.१४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पाच जानेवारी रोजी पेट्रोलचे दर दर ९१ रुपये ५३ पैसे होते. हे दर दीड महिन्यात सहा रुपये ६१ पैशांनी वाढली आहे. तर डिझेलचे दर ८१ रुपये ७१ पैशांवरून ७ रुपये ५० पैशांनी वाढून ८९.२१ रुपये प्रतिलिटर झाला आहे. आगामी काळात दर कायम राहिल्यास, आगामी आठवड्यात पेट्रोल दराचा आकडा हा शंभरी गाठणार असण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील साध्या पेट्रोल-डिझेलचा प्रतिलिटर दर

शहर                     पेट्रोल          डिझेल
औरंगाबाद           ९८.१४           ८९.२१
बीड                     ९७.८९          ८७.५९
जालना                ९७.९८           ८७.६७
लातूर                   ९७.९२          ८७.६३
नांदेड                  ९८.९७          ८८.६४
उस्मानाबाद         ९७.३५          ८७.०८
परभणी                ९९.१०           ८८.७५
हिंगोली                ९७.८६          ८७.०७

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!