औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा युवा सेनेची कार्यकारिणी नुकतीच घोषीत झाली. पण या कार्यकारिणीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी झालीय. युवा सेनेतील गटबाजी ही भविष्यासाठी घातक असल्याची प्रतिक्रीया शिवसेना नेते आमदार प्रदिप जैस्वाल यांचे पूत्र आणि युवा सेनेचे पदाधिकारी ऋषिकेश जैस्वाल यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना दिली. औरंगाबाद महानगरपालिकेची तयारी करत असल्यामुळे आपण पदासाठी इच्छुक नव्हतो. मात्र, कोणत्याही प्रकारची गटबाजी ही पक्षासाठी घातक असल्याचा आरोप ऋषिकेश यांनी केलाय.
या कार्यकारिणीमध्ये माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक ऋषीकेश खैरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवेंची पकड दिसून आली. यातच दानवेंचे चिरंजीव धर्मराज दानवेंची मध्य विधानसभा क्षेत्राच्या सरचिटणीसपदी निवड केली आहे. तर युवा सेना जिल्हाधिकारी ऋषीकेश खैरेंची पदोन्नती करुन त्यांना उपसचिव पद देण्यात आले आहे. राजेंद्र जंजाळ गटाचे शहर युवा अधिकारी हनुमान शिंदेची निवड केली आहे. यामध्ये ऋषीकेश जैस्वाल यांना कोणतेही पद देण्यात आले नाही. त्यामुळे युवा सेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकारिणीवर शिवसेनेच्या एका गटाचा प्रभाव तसेच वरचष्मा दिसून आला हे मात्र नक्की.
नवीन कार्यकारिणीमध्ये नवीन जोमाच्या टीमची निवड होईल, तसेच नवीन पण काम करणाऱ्या कार्यकर्तांना यात संधी दिली जाईल, ही अपेक्षा देखील फोल ठरली. औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जैस्वाल हे युवा सेनेच्या स्थापनेपासून सक्रीय असून देखील त्यांना या कार्यकारिणीमध्ये डावलण्यात आले. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, औरंगाबाद जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव नगरसेवक ऋषीकेश खैरेंच्या गटाने औरंगाबादची युवा सेना पुर्णपणे हायजॅक केलेली दिसते. यामध्ये आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक राजू वैद्य यांच्या गटातील कार्यकर्त्यांना डावलले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
- चिंताजनक! लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना
- पुन्हा लॉकडाऊन? कोरोना फैलावत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतातूर
- पैठण तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पंधरा दिवसांसाठी बंद
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
