औरंगाबाद : अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने कडक पावले उचलत तातडीने अनेक निर्णय घेतले आहेत. यात तालुक्यातील सर्व गावातील आठवडी बाजार पंधरा दिवसासाठी रद्द करण्यात आले. पैठण तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी नगरपरिषद, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, पंचायत समिती, आरोग्य विभाग, बांधकाम विभागासह संबधित सर्व विभाग प्रमुख तसेच कोचिंग क्लासेस चालक, मंगल कार्यालय मालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यांची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांनी आदेश दिले आहेत.
यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, पैठण पोलीस ठाण्याचे पो.नि. किशोर पवार, एमआयडीसी ठाण्याचे सपोनि अर्चना पाटील, बिडकीनचे सपोनि पंकज उदावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आगाज आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील मंगल कार्यालय, मठ, मॉल्स मालकांना लग्न, साखरपुडा तसेच इतर होणारे कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंचे पालन करीत व कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करीत ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचे आदेश करण्यात आले. शहर व तालुक्यातील कोचिंग क्लासेस चालकांना ५० टक्के विद्यार्थी संख्येच्या उपस्थितीत सुरू असावे तसेच अंत्ययात्रेत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधी पार पडण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुकेश अंबानी उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

