🕒 1 min read
नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असते.
आता पुन्हा एकदा कंगना आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. काँग्रेस आमदाराला कंगनाने सणसणीत टोला लगावला आहे. मध्य प्रदेश बैतूलच्या मुलताई विधानसभेचे काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांच्यावर तिने हल्लाबोल केला आहे. पानसे यांनी कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. यावर कंगनाने ‘आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते’ असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे.
कंगना राणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कतरीना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी मोठे अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते’ असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Whoever this fool is does he know I am no Deepika Katrina or Alia…. I am the only one who refused to do item numbers, refused to do big hero ( Khan /Kumar) films which made entire Bullywoodiya gang men +women against me. I am a Rajput woman I don’t shake ass I break bones. https://t.co/6mBxxfVL1e
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 19, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांनी नुकतंच अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी कलेक्टरच्या समोरच कंगनाला नाचणारी-गाणारी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी सारनीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या आगामी धाकड सिनेमाचं चित्रिकरण थांबवण्यासाठी पोहोचले होते. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या लाठीचार्जनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- ‘रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?’
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
