परभणी : परभणी शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ नागरिकांकडून १० हजार ८०० रुपयांचा दंड नुकताच वसूल केला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नुकतीच बैठक घेतली. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मनपाला १५ पथक स्थापन करुन कारवाईचे आदेश दिले हाेते. त्या नुसार शहरातील मुख्य बाजारपेठा, गर्दीचे ठिकाण, बसस्थानक, रेल्वेस्टेशनसह आदी परिसरात ही माेहिम राबवण्यात आली.
या वेळी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मनपाने १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. या वेळी महानगर पालिका, पाेलिस प्रशासन, जिल्हाप्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. काेराेनाचा कहर महाराष्ट्रामध्ये खुप माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानंतर मराठवाड्यामधील सर्व जिल्हास्तरावर ठिकठिकाणी काेरानाबाबतच्या उपाययाेजना करण्यासाठी बैठक घेवून काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून विना मास्क फिरु नये,सॅनिटाइझरचा वापर नियमीत पणे करावा. साेशल डिस्टंसिंग ठेवावे या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. या वेळी सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, मुख्य स्वच्छता निरिक्षक महंमद अब्दुल शादाब, लक्ष्मण जाेगदंड, न्यायरत्न घुगे, जय मकरंद कुणाल भारसाकळे, दत्ता गवाले यांची उपस्थिती हाेती.
महत्वाच्या बातम्या
- ‘विद्यापीठाने निर्भयपणे काम करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य’
- देवगिरी किल्ल्यात स्वच्छता करून ‘शिवजागर’
- ‘त्या’ मुलीचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यात सापडला
- ‘हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सत्ताधारी नेत्यांचे मौन का?’
- महाविकास आघाडीने छत्रपतींच्या गादीचा अपमान केला; निलेश राणेंची सडकून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

