Share

‘त्या’ मुलीचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यात सापडला

Published On: 

🕒 1 min read

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील शाहूनगर येथील २० वर्षीय युवती चार दिवसापूर्वी वह्या आणण्यासाठी गेली होती. ती घरी परतलीच नाही. दरम्यान गुरुवारी सकाळी या युवतीचा मृतदेह ढालेगाव बंधाऱ्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. संपदा घुले ( २०) असे मृत युवतीचे नाव आहे.

चार दिवसांपूर्वी संपदा घुले ( २०) ही मुलगी वह्या खरेदी करण्यासाठी म्हणून गेली ती गुरवारपर्यंत घरी परतली नाही. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी शहरामध्ये शोधाशोध केली. परंतू तिचा शोध लागला नसल्याने संपदा हरवल्याची तक्रार तिच्या वडीलांनी पाथरी पोलिसात तक्रार दिली होती. गुरुवारी ढालेगाव पुलावर एक स्कूटी बेवारस स्थितीत आढळून आली. दरम्यान गुरुवारी सकाळी या युवतीचा मृतदेह ढालेगाव बंधाऱ्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला.

त्या तरुणीने आत्महत्या केली की घातपात या बाबत पाथरी पोलिस शोध घेत आहेत. सापडलेले वाहन पोलिसांनी मृताचे वाहन असल्याची शंका व्यक्त केली आहे. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!