औरंगाबाद : विद्यापीठ प्रशासनाला निर्भयपणे काम करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे नेहमी सहकार्य राहणार असल्याचे मत पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी विद्यापीठाच्या सदिच्छा भेटी दरम्यान केले. या वेळी डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, मी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याने मला याचा अभिमान आहे.
या वेळी डॉ. गुप्ता यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची सदिच्छा भेट घेतली. काही दिवसात विद्यापीठ परिसरात काही अशैक्षणिक क्षेत्रातील लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून तसेच गरिब विद्यार्थी येथे येतात. त्यामुळे परिसरील शांतता भंग होणार नाही, याकडे आम्ही लक्ष देणार असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी या वेळी सांगितले.
डॉ. गुप्ता यांनी विद्यापीठामध्ये व्यवस्थापनशास्त्र विभागातून २००५ मध्ये पीएचडी केली आहे. मा झे विद्यापीठाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेही या वेळी सांगितले. त्यामुळे तेथे विद्यापीठ नेहमी शांत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पोलिस आयुक्त यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ मुलीचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यात सापडला
- ‘मुख्यमंत्री न होता विरोधकांचा नेता झाल्याने फडणवीसांची आकसातून टीका’
- परभणीत सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस
- ‘ठाकरेंची सत्ता असलेला हा महाराष्ट्र आहे जिथे मटन पार्टीला परवानगी आहे मात्र शिवजयंतीला नाही’
- नेटकऱ्यांनी झापल्यावर अमिताभ बच्चनची अक्कल आली ठिकाण्यावर, महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

