Share

‘हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सत्ताधारी नेत्यांचे मौन का?’

Published On: 

लातूर : मराठवाड्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते निष्क्रिय आहेत. बैठकीत बोलण्याऐवजी गप्प बसतात. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मराठवाड्यावर अन्याय करत नाहीत, तर आपलेच नेते करतात असा आरोप भाजप आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. उजनीच्या पाण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी ते का ठेवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.

केंद्राच्या अर्थसंकल्पात मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याला किती निधी मिळाला, त्याचा फायदा किती होणार आहे, याची माहिती देण्यासाठी भाजपने लातूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात भाजप आमदार उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी आवाज उठवणार आहेत.

औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी उजनीच्या पाण्याचा विषय लावून धरणे आवश्यक होते. मात्र, कोणी बोलले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर केले होते. त्यामध्ये लातूरला सिना कोळेगावच्या माध्यमातून म्हणजे उजनीतूनच लातूरला पाणी आणण्याची योजना होती. ती या सरकारने रद्द केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट ज्यांच्या हातात आहे त्यांना उजनीचे पाणी विषय काढलेले आवडत नाहीत. विषय काढला तर आपल्याला मंत्रिमंडळातून काढले जाईल या भीतीने सत्ताधारी बोलत नसावेत,’ असा टोलाही निलंगेकर यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!