🕒 1 min read
सिंधुदुर्ग : आज राज्यासह देशभरात शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवभक्तांमध्ये कमालीचा उत्साह असला तरी कोरोनाचं सावट असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्याने शिवभक्तांसह भाजप, मनसे व इतर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गड-किल्ल्यांवर जमा होऊन शिवजयंती साजरी करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भाजप नेते निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील निर्बंधांचा आदेश तोडून शेकडो शिवभक्तांसह शिवजयंती सोहळा साजरा केला आहे. यानंतर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ‘शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट आहे.’ अशी टीका त्यांनी केली.
तर, ‘शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. याठिकाणी शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे.’ असं भाष्य निलेश राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेटकऱ्यांनी झापल्यावर अमिताभ बच्चनची अक्कल आली ठिकाण्यावर, महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख
- ‘ठाकरेंची सत्ता असलेला हा महाराष्ट्र आहे जिथे मटन पार्टीला परवानगी आहे मात्र शिवजयंतीला नाही’
- ‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’
- महिलांनो वेळीच सावध व्हा ! ‘डीपी’चं कौतुक करून जाळ्यात ओढणाऱ्या नराधमाला अटक
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’


