मुंबई : आज राज्यासह देशभरात शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवभक्तांमध्ये कमालीचा उत्साह असला तरी कोरोनाचं सावट असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. दरम्यान, शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना स्वतः च सोशल मीडिया स्वतः सांभाळणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी शिवजयंतीच्या मराठीत शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्याकडून मोठी चूक घडली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरून नेटकाऱ्यानी त्यांना कमेंट्समध्ये चांगलच झापलं. फेसबुकवर त्यांनी हा एकेरी उल्लेख केला होता.

चूक लक्षात आणून देताच अमिताभ बच्चन यांनी या फेसबुक पोस्टमध्ये सुधार करत ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी पोस्ट केली आहे. एवढ्या बड्या अभिनेत्याकडून अशी चूक होणे अपेक्षित नसून जबाबदारी ओळखून पहिल्याच वेळी पोस्ट करताना योग्य खबरदारी घेणे व सोशल मीडियावरील पोस्टसह इतर सर्वच व्यक्तींनी देखील प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदरपूर्वक उल्लेख करून योग्य सन्मान करणं गरजेचं आहे.

काँग्रेस व अमिताभ बच्चन वाद –
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय पक्ष यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर देशाबाहेरील कलाकारांनी भाष्य केल्यानंतर देशातील काही सेलिब्रिटींनी त्यांना विरोध केला होता. यात खेळाडू, बॉलिवूड कलाकार आदींचा समावेश होता.
वाढलेल्या इंधन दरांवर काँग्रेस सरकारच्या काळात भाष्य करणारे अमिताभ बच्चन व अक्षय कुमार हे सद्या पेट्रोल शंभरी पार जात असताना देखील गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसने केला असतानाच अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी चांगलचं झापलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची डोळ्यांची भाषा अन् उद्धव ठाकरेंनी घेतली फिरकी
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- ‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’
- महिलांनो वेळीच सावध व्हा ! ‘डीपी’चं कौतुक करून जाळ्यात ओढणाऱ्या नराधमाला अटक
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

