🕒 1 min read
लातूर : महावितरण कंपनीने जर निलंगा तालुक्यातील वीज थकबाकीदार शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरु आणि महावितरणच्या कर्मचाऱ्याला धडा शिकवा असा इशारा काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके यांनी सांगितले. बुधवारी निलंगा विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कृषी ग्राहकांची सुधारित थकबाकी रक्कम ही शासनाच्या परिपत्रकानुसार सप्टेंबर २०२० च्या बिला नुसार गोठविण्यात आली आहे. सदर रकमेचे कोणतेही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही ही रक्कम ग्राहकास तीन वर्षापर्यंत भरण्याची सुविधा ग्राहकास देण्यात आलेली आहे. सप्टेंबर २०२० या बिलातील गोठविलेल्या थकबाकीमुळे कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडित करू नये अशी तरतुद आहे. परंतू असे असतानाही महावितरणकडून निलंगा तालुक्यातील कृषी पंपाचे कनेक्शन कर्मचा-याकडून तोडले जात असल्याने परिसरातील शेतक-यांनी संताप व्यक्त केला.
विजबील संदर्भात शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचे निवारण करावे मगच वसुलीची प्रक्रिया करावी, वीज बिल भरणा न करणा-या शेतकऱ्याला कोणतीही नोटीस न बजावता कुठलीही कारवाई करू नये, ज्या ग्राहकाने चालू बिल भरले आहे मात्र केवळ थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करू नये असे सांगत १५ फेब्रुवारीच्या नवीन पत्रकानुसारच महावितरण कंपनीची कारवाई असावी असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, परिपत्रकानुसारच महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी अंमलबजावणी करावी. याबाबत मी स्वत: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क करून शेतक-यांच्या वीजभरणा बाबत यापेक्षाही शितल अट करून घेणार असल्याचे निलंगेकर यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर! ‘या’ तारखेपासून जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाची लस
- ‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’
- महिलांनो वेळीच सावध व्हा ! ‘डीपी’चं कौतुक करून जाळ्यात ओढणाऱ्या नराधमाला अटक
- धक्कादायक! मामाचा तेरा वर्षीय भाचीवर अत्याचार
- मनपाने वीजबील थकवल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची भिती


