Share

खुशखबर! ‘या’ तारखेपासून जेष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग दूर करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लसीकरण करण्यासाठी तीन टप्प्यात लस उपलब्ध झाल्या आहेत. मार्च महिन्यानंतर ५० वर्षावरील वरील लोकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे यांनी दिली.

हळूहळू कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र आता लस उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी, आरोग्य विभागाशी संबंधित कोरोनात काम केलेल्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय मार्च महिन्यानंतर ५० वयोगटाच्या वरील लोकांना लस दिली जाणार आहे. त्यात को व्हॅक्सिन, कोव्हीड सीड या दोन्ही लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात २ हजार को-व्हॅक्सिंन तर ६४ हजार कोव्हीड सीड उपलब्ध झाल्या.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यात को-व्हॅक्सिंन १ हजार ४००  तर कोव्हीड सीड ५४ हजार उपलब्ध झाल्या आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला जात आहेत. तीन टप्प्यात सध्या लस देण्याची तयारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क लावणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, स्वतः ची काळजी घेऊनच सर्वांनी घराबाहेर पडावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!