Share

मनपाने वीजबील थकवल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची भिती

Published On: 

लातूर: शहर मनपाने महावितरणचे पाणीपुरवठ्याचे वीजबील थकवले आहे. सध्या महावितरण थकबाकी मोहिम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान महानगपालीकेने थकित वीजबील रकमेचा भरणा केला नाही तर शहराचा पाणीपुरवठा खंडीत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असे झाले तर शहराच्या नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागु शकतो.

शहराच्या पाणीपुरवठा वीजेची लातूर मनपाकडे १४ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. मनपाने या महिन्यात १० फेब्रुवारी रोजी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० चे चालू वीजबिल ६५ लाख रुपये भरले होते. डिसेंबर व जानेवारी महिन्याचे अनुक्रमे २८.२२ व २८.५६ लाख रुपये चालू वीजबिलात वाढ झाली आहे. चालु वीजबिलाच्या १४ कोटी ५५ लाखातील ६५ लाख रुपये महापालिकेने भरले आहे. त्यामुळे शिल्लक वीजबिल १३ कोटी ८३ लाख रुपये राहिले आहे. यादरम्यान वीजबिलातील ५७ लाख रुपये वाढल्याने मनपाकडे आता महावितरणची पाणी वीजबिलाची थकबाकी १४ कोटी ४० लाख रुपये आहे.

महावितरणने पाणी पुरवठ्याच्या वीजबिलाची थकबाकी भरावी म्हणून मनपास दोन नोटीसा बजावल्या. नोटीसांचा कालावधी संपला तरी मनपाने पाणीपुरवठ्याच्या वीजबिलाची थकीत रक्कम भरली नाही त्यामुळे महावितरण शहराच्या पाणीपुवठ्याचा वीजपुरवठा खंडीत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर असून असे झाले तर शहराच्या पाणीपुवरवठ्याची अडचण होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!