🕒 1 min read
नवी दिल्ली- नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईला दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानातील तालिबानी दहशतवादी संघटनेच्या एहसानुल्लाह एहसा नामक एका व्यक्तीनं ट्विटरद्वारे तिला ही धमकी दिली आहे.
एहसानुल्ला एहसान या तेहरीके-तालिबानचा सदस्य असलेल्या दहशतवाद्याने, नऊ वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाईला गोळ्या घालून जखमी केले होते. तिच्यावर पुन्हा हल्ला करण्याची धमकी नुकतीच त्याने ट्विटरवरून दिली आहे.
“आपल्या घरी परत ये आपण चर्चा करुन तोडगा काढू शकतो. अन्यथा गेल्या वेळची चूक आम्ही पुन्हा करणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन मलाला हिला धमकी देण्यात आली आहे. ट्विटरने त्वरीत एहसानुल्ला एहसानचं अकाउंट निलंबित केलं आहे.
मलाला हिच्यावर ऑक्टोबर 2012 मध्ये पाकिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी तिच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर तिला तत्काळ उपचारासाठी ब्रिटन येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर या परिस्थितीतून मलाला पूर्ण बरी झाली. त्यानंतर तिने ब्रिटनमध्येच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
मरणाच्या दारातून परतल्यानंतरही मलालाने तालिबानच्या विरोधाला न जुमानता पुन्हा स्वत:च्या आणि अन्य मुलींच्या शिक्षणासाठी काम सुरू केले होते. यानंतर बालकामगार पद्धत आणि लहान मुलांच्या तस्करीविरुद्ध लढा देणारे भारतातील कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई यांना 2014 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या पाकिस्तानातील शिक्षणाची मालाला एवढी काळजी करत होती त्याच पाकिस्तानातील शाळांमध्ये ‘मलाला विरोधी दिन’ पाळण्यात येतो. ‘आय अॅम नॉट मलाला’ अशा घोषणा शाळांमधून दिल्या जातात.‘पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो या माझ्या आदर्श आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मला वाटचाल करायची आहे आणि एक दिवस पाकिस्तानची पंतप्रधान व्हायचं आहे,’ अशी इच्छा देखील तिने बोलून दाखवली आहे.
दरम्यान, भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य केल्याने देखील मलाला युसूफझाई टीकेची धनी बनली होती. मलाला हिने काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भीती व्यक्त केली होती. माझे आई-वडिल लहान होते तेव्हापासून काश्मीरमधील लोक संघर्षमय जीवन जगत आहेत. दक्षिण आशियाला मी माझं घर समजते, त्यामुळे काश्मीरविषयी मला विशेष काळजी वाटते असे ती म्हणाली होती.
एकमेकांना अडचणीत टाकण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. परंतु, सध्याच्या परिस्थितीत काश्मीरमधील लहान मुलं आणि महिलांची काळजी वाटत आहे. काश्मीरमधील स्थिती अत्यंत तणापूर्ण असून संघर्ष झाल्यास अनेकांचे नुकसान होऊ शकते, असंही मलालाने नमूद केले होते.
महत्वाच्या बातम्या
- बालेकिल्ले अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांची व्यूहरचना
- महावितरणचा वीज वसुली मोर्चा मनपाकडे; दोन दिवसाचा अवधी
- पोलिस कर्मचाऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, सोशल मिडियावर ऑडीओ क्लिप व्हायरल
- सातारा पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल केला फिर्यादींना परत
- ‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

