Share

‘काही साप चावतात, काही चावत नाहीत ; पण त्यांना ठेचायचं असतं’

Published On: 

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. नेहमीप्रमाणेच आजही शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सोव सोहळा पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे.

यावेळी आमच्या धमण्यांमध्ये, रक्तांमध्ये शिवाजी महाराज आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र डागलंय. ‘काही साप चावतात तर, काही चावत नाहीत, पण त्यांना ठेचायचं असतं; असा घणाघात त्यांनी केलाय.

‘शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत. दुसरे वर्ष आहे शिवनेरीवर येण्याचे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे. तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे. साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता तोफ डागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!