Share

सातारा पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल केला फिर्यादींना परत

Published On: 

औरंंगाबाद : सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यापैकी तीन गुन्ह्यात हस्तगत केलेले १ हजार ग्रॅम सोन्याचे दागिने, १७३ ग्रॅम चांदीचे दागिने, २५ दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने गुरुवारी (दि.१८) मुळ फिर्यादीना पोलिस उपायुक्त दीपक गिNहे यांच्या हस्ते परत करण्यात आला. यावेळी आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. यावेळी सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे उपस्थित होते.

सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध चोरीच्या घटना उघड करून पोलिसांनी चोरांकडून मुद्देमाल हस्तगत केला होता. यामध्ये १ हजार १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १७३ ग्रॅम चांदी, २५ दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली होती. हा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच गुरुवारी सातारा पोलीस ठाण्यात फिर्यादीना बोलावण्यात आले होते.

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त दिपक गि-हे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या हस्ते सन्मानाने मूळ मालकांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज परत करण्यात आला. यावेळी सर्वांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मोहरील एस.एन.धुळे आणि पोलिस अंमलदार वाय.पी. क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!