🕒 1 min read
नांदेड : कोरोना काळातील वीजबील थकबाकी साठी महावितरण सध्या घरगुती, व्यवसायिक व औद्योगीक ग्राहकाकंडून वसुली करत आहेत. आता महावितरणने आपला मोर्चा महानगरपालिकेकडे वळवला. पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याची थकबाकी जमा करण्यासाठी महावितरणने महानगरपालिकेला दोन दिवसाचा अवधी दिला आहे. महानगर पालिकेकडे एकूण ५८ कोटी २६ लाख रुपये वीजबील थकबाकी आहे.
कोरोना काळातील परिस्थिती बघून महावितरणने गेल्या दहा महिन्यात एकाही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला नव्हता. महावितरणची थकबाकीचा डोंगर वाढतच चालला आहे. वीज विकत घेण्यासाठी महावितरणला वित्तीय संस्थाकडून कर्ज काढावे लागत आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणुन वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरु केली. या दरम्यान महावितरणने महानगरपालिकेला पाणीपुरवठा व पथदिव्याची थकबाकी भरण्यासंदर्भात ११ व २१ जानेवारी रोजी पत्र पाठवले होते. या पत्रात थकबाकी न भरल्यास वीज खंडित करण्याचा इशारा केला होता.
मात्र अद्याप थकित रकमेचा भरणा मनपाने न केल्यामुळे विजपुरवठा खंडित करण्याची कारवाई दोन दिवसात करु असा इशारा मनपाला दिला. मनपाकडे लघु दाब वर्गवारीतील पथदिव्यांचे ६६४ वीज जोडण्यांकडे १० कोटी ५० लाख रुपये थकबाकी, तर लघुदाब वर्गवारीतील पाणी पुरवठा योजनांचे १५९ वीज कनेक्शनचे ८५ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. तर उच्च दाब वर्गवारीतील पाणीपुरवठ्याच्या १५ वीज कनेक्शन कडे ४६ कोटी ९१ लाख रुपये थकबाकी आहे. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे थकबाकी वसुली करिता महावितरणला वीज पुरवठा खंडीत करण्या शिवाय पर्याय उरला नाही.
महत्वाच्या बातम्या
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- रायगडावर विद्युत रोषणाईवर अजित पवार म्हणाले, हा उत्साही लोकांचा अजाणतेपणा !
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- ‘तबलिगी प्रकरणाची पुनरावृत्ती ‘वशाटोत्सव’च्या गर्दीतून झाली तर…
- जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठीच अधिवेशनाला कात्री लावण्याचा सरकार प्रयत्न करतंय का ?


