Share

बालेकिल्ले अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांची व्यूहरचना

Published On: 

🕒 1 min read

बीड : २० मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत गुरुवारी चौथ्या दिवशी २८ इच्छुकांनी ३० अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत आहे. मात्र, आजपासून सलग तीन सुट्या आल्याने एकच दिवस शिल्लक राहिला आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या होत असलेली निवडणूक पक्षीय धोरणांऐवजी व्यक्तिकेंद्रीत होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आपापले बालेकिल्ले अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांनी व्यूहरचना सुरू केलीय.

बीड डिसीसीच्या १९ संचालकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. १५ फेब्रुवारीपासून आतापर्यंत अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून यशवंत खंडागळे व बबन लोंढे या दोघांचे अर्ज आले होते. मात्र, गुरुवारी एकाच दिवशी २८ इच्छुकांनी ३० उमेदवारी अर्ज दाखल केले. तर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून १४ जणांनी उमेदवारी दाखल केली. यात वसंत सानप, भाऊसाहेब नाटकर, विजयसिंह पंडित,बापूराव सिरसट, जीवन जोगदंड, धनंजय साबळे, तांबोळी रमजान, अशोक पवार, महेंद्र गर्जे, सुशीला पवार यांचा समावेश आहे. जयदत्त धस व फुलचंद मुंडे यांचे प्रत्येकी दोन अर्ज आहेत.

महिला राखीव मतदारसंघातून अर्चना सानप व सुशीला पवार यांचे अर्ज आले.अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून जालिंदर गायकवाड यांचा अर्ज आला आहे. इतर संस्था मतदारसंघातून रामदास खाडे यांचा अर्ज असून नवनाथ शिराळे यांचे दोन अर्ज आहेत. इतर मागास प्रवर्गातून अरुण वाघमारे व कल्याण आखाडे यांनी अर्ज भरले. २० मार्च रोजी मतदान तर २१ मार्चला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.

दरम्यान, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व आहे. इतर शेती मतदारसंघावर राजाभाऊ मुंडे यांचे प्राबल्य आहे. सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस तसेच विजयसिंह पंडित पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या राजकारणात उतरलेत. रमेश आडसकर यांनीही जोर लावला असून आ.प्रकाश सोळंके सक्रिय आहेत. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात चुरस पाहायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!