औरंंगाबाद : ग्रामीण पोलिस दलातील मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अशोक बाबासाहेब मुळे (बक्कल नंबर २८३) असे आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ग्रामीण पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात वाहन चालक असलेले अशोक मुळे हे करमाड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. मोटार परिवहन विभागातील एम.टी.ओ.मोहोड हे गेल्या काही दिवसापासून अशोक मुळे यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मुळे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
तसेच मुळे हे शेंद्रा एमआयडीसी येथे वाळूची वाहने अडवून हप्ता वसूल करतात असा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या जाचाला वंâटाळून आत्महत्या करण्याचा विचार मनात येत असून माझ्या आत्महत्येस एम.टी.ओ.मोहोड यांना जबाबधार धरावे असे मुळे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुळजाभवानीच्या शहरात कोरोनाचे नियम कडकपणे राबवणार
- ‘कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही’
- राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग
- ‘पक्षांतर बंदीचा कायदा क्षीरसागरांना लागू होत नाही का?’
- जूही चावलाने शेअर केला शारूखचा मुलगा आर्यन आणि मुलगी जान्हवीचा फोटो, लिहिला खास संदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

