मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल’, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.
दरम्यान, भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दात शेलारांनी राऊतांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा. मात्र, या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही’, असं शेलार म्हणाले.
शिवजन्मोत्सावर निर्बंध घातले गेले आहेत, यावरूनही शेलारांनी सरकारवर टीका केली आहे. ‘शिवजन्मोत्सव हा दिवाळी सणासारखा एक मोठा उत्सव आहे. सरकारने कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घ्यायला हवीच. मात्र, शिवभक्तांचा उत्साह देखील लक्षात घ्यावा. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- ‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे
- यंदा आयपीएल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकणार मैक्सवेलने दाखवला विश्वास


