उस्मानाबाद : तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील दोन शिक्षकांसह ९ जणांना कोरोना झालाय. या पार्श्वभूमीवर नवोदय विद्यालयातील वर्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच लातूर रोड भागातील एकाच कुटुंबातील ६ सदस्य पॉझिटिव्ह आढळलेत. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळं आजपासून कोरोनाचे नियम कडकपणे राबविण्यात येणारेत.
शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील २ शिक्षक व त्यांचे कुटुंबीय असे ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शिक्षकांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना विद्यालयातच क्वारन्टाईन करण्यात आले आहे. तर तातडीने नवोदयचे वर्ग बंद केलेत. पुढील दोन दिवसात नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची नव्याने कोरोना टेस्ट घेण्यात येणारेत. तसेच शहरातील पुजारी बांधवासह व्यावसायिकांनी सर्वांना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंदिरात दर दोन तासाला फवारणी करणे, सॅनिटायझेशन आदी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे नगरपालिका सतर्क झाली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड देण्यात येणार आहे. प्रतिबंधकात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने विविध पथके स्थापन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- ‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे
- जूही चावलाने शेअर केला शारूखचा मुलगा आर्यन आणि मुलगी जान्हवीचा फोटो, लिहिला खास संदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

