🕒 1 min read
अमरावती : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन करत काळजी घेण्यासाठी देखील सांगितलं आहे.
बच्चू कडू ट्विट करत म्हणाले, ‘माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची घ्यावी. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्या.’
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. अकोला आणि अमरावती हे जिल्हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहेत. यवतमाळ जिल्हातही परिस्थिती वेगळी नाही आहे. राज्य सरकारकडून वेळोवेळी याबाबत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. याठिकाणी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे.
माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- ‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे
- जूही चावलाने शेअर केला शारूखचा मुलगा आर्यन आणि मुलगी जान्हवीचा फोटो, लिहिला खास संदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

