🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा काल पासून सुरु झाला आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये आयपीएल खेळला जाणार असून या लिलावात काही दिग्गज क्रिकेटपटूंवर जोरदार धनवर्षा झाली. आयपीएलच्या लिलावात प्रथमच चार खेळाडूंना 14 किंवा 14+ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले.
ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरला. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यनसुद्धा या आयपीएलच्या लिलावात प्रथमच दिसला. शाहरुख आणि जूही चावला कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) फ्रँचायझी संघाचे सह-मालक आहेत. यापूर्वी जूही चावला हिची मुलगी जान्हवी मेहतासुद्धा या लिलावात सहभागी झाली होती, तर आर्यनला पहिला अनुभव होता. या दोघांचे फोटो शेअर करताना जूही चावलाने लिहिले की, ‘केकेआरची दोन्ही मुले पाहून खूप आनंद झाला. लिलाव टेबलवर आर्यन आणि जाह्नवी. ‘
So happy to see both the KKR kids, Aryan and Jahnavi at the Auction table .. ????????????????????
@iamsrk @KKRiders pic.twitter.com/Hb2G7ZLqeF— Juhi Chawla Mehta (@iam_juhi) February 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- ‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे
- यंदा आयपीएल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकणार मैक्सवेलने दाखवला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

