🕒 1 min read
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. अकोला आणि अमरावती हे जिल्हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहेत. यवतमाळ जिल्हातही परिस्थिती वेगळी नाही आहे. राज्य सरकारकडून वेळोवेळी याबाबत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. याठिकाणी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे.
राज्यातील एकूण ९ जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात कडक निर्बंधांचे संकेत देण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्याने रत्नागिरीतील एक गाव कंन्टेंमेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे
दरम्यान, हा धोका पुन्हा एकदा वाढू लागला असल्याने सर्वांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची चिने असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी या औषधाची घोषणा केली.
योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना व्हायरसवरचं अधिकृत तथा प्रमाणित औषध बाजारात आलं आहे. याचसोबत पतंजलीचा वैज्ञानिक रिसर्च पेपर देखील लॉन्च केला गेला आहे. या लॉन्चिंग कार्यक्रमाला देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसंच रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. आम्ही लॉन्च केलेला रिसर्च पेपर कोरोना व्हायरसच्या पहिल्या प्रमाणित औषधाशी संबंधित आहे.
‘गर्वाचा क्षण…. पतंजलीद्वारे कोव्हिड 19 च्या करिता पहिलं प्रमाणित औषध सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे’, असं पतंजली आयुर्वेदने ट्विट करुन म्हटलं आहे. आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनिल कोट्यवधी लोकांना जीवन देतं आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आम्ही लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर केल्या आहेत, असं पतंजलीने म्हटलं आहे.
https://twitter.com/PypAyurved/status/1362630636742221826?s=20
https://twitter.com/PypAyurved/status/1362630768271364101?s=20
महत्वाच्या बातम्या
- तुळजाभवानीच्या शहरात कोरोनाचे नियम कडकपणे राबवणार
- ‘कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही’
- राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग
- ‘पक्षांतर बंदीचा कायदा क्षीरसागरांना लागू होत नाही का?’
- जूही चावलाने शेअर केला शारूखचा मुलगा आर्यन आणि मुलगी जान्हवीचा फोटो, लिहिला खास संदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

